अविनाश इंगावले
गेवराई दि १६-तालुक्यातील २१ ग्रापंचायतीचे निकाल समोर येत असून दुपारी १२ वाजता हाती आलेल्या माहितीनुसार गेवराई तालुक्यातील अॅड सुरेश हात्ते तसेच बप्पासाहेब तळेकर या दोन दिग्गज नेत्याला स्थानिक स्वराज्य निवडणूकीत परभावाला सामोरे जावे लागले आहे.प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायतीवर मादळमोही याठिकाणी दिपक वांरगे तसेच तलवाडा येथील विष्णू हात्ते यांच्या पुरस्कृत पॅनलने बाजी मारली आहे.तर गढीत राष्ट्रवादीने आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
तलवाड्यात अॅड सुरेश हात्ते यांची २५ वर्षांपासून वर्चस्व होते.याठिकाणी राष्ट्रवादी-शिवसेना यांनी मिळून विष्णू हात्ते यांच्या नेतृवाखाली पॅनल उभा केले होते.यामध्ये भाजपाच्या वतीने अॅड सुरेश हात्ते यांचे पॅनल होते.या निवडणुकीत १७ उमेदवारा पैकी १६ उमेदवार हे विष्णू हात्ते गटाचे निवडून आले असून अॅड सुरेश हात्ते यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. तसेच मादळमोही याठिकाणी राष्ट्रवादीचे नेते दिपक वारंगे यांचे १७ पैकी १७ उमेदवार विजयी झाले असून या निवडणूकीत स्थानिक नागरिकांनी गावातील प्रस्थापितांना हद्दपार केले असल्याचे चित्र आहे .
तलवाड्यात प्रा शाम कुंड यांची नाराजी भोवली ?
दरम्यान या निवडणुकीत प्रा शाम कुंड यांची नाराजी अॅड सुरेश हात्ते यांना भोवली असल्याची चर्चा असून प्रा.शाम कुंड यांनी भाजपात असताना अॅड सुरेश हात्ते यांचा प्रचार केला नाही.त्यामुळे या निवडणुकीत अॅड.हात्ते यांना पराभवाचे तोंड पाहावे लागत असल्याच्या चर्चा आहेत.