पाटोदा दि.२६ (प्रतिनिधी)- पाटोदा (patoda) शहरामध्ये सुरु असलेल्या मटका बुकीवर आणि ऑनलाईन बिंगो चक्री जुगारावर (दि.२५) रोजी सहाय्यक पोलीस अधिक्षक कमलेश मीना यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण ४३,०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
सहाय्यक पोलीस अधिक्षक (beed police) कमलेश मीना यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, पाटोदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कल्याण नावाचा मटका जुगार आणी ऑनलाईन बिंगो चक्री जुगार काही इसम स्वतःच्या फायद्यासाठी खेळत आणी खेळवीत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्या नंतर त्यांच्या पथकाने (दि.२५) रोजी सदर ठिकाणी छापा मारून एकूण ४३,०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ऑनलाइन चक्री चालवणारा मालक भरत जाधव, चक्री चालत असलेला गाळा मालक बप्पा बावणे, चक्री चालवण्यासाठी आयडी पुरवणारा आयडी मालक चव्हाण,(रा. धाराशिव) तसेच तीन मटका घेणारे एजंट व त्यांचा मटका बुकी मालक भरत नागरगोजे (रा. पाटोदा) अश्या एकूण सात आरोपींवर पाटोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना,दिलीप गित्ते,शमीम पाशा,प्रकाश मुंडे, शहादेव म्हेत्रे यांनी केली.