Advertisement

३६ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यु 

प्रजापत्र | Saturday, 20/07/2024
बातमी शेअर करा

 गेवराई दि.२० (प्रतिनिधी)-  शहरातील संजय नगर परिसरात एका तरूणाचा संशयस्पद मृत्यु झाला असल्याची घटना आज दि २० जूलै रोजी उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
  सविस्तर माहिती अशी कि,संभाजी हरीभाऊ गायकवाड (वय ३६ वर्ष ) राहणार संजय नगर गेवराई असे मयत ईसमाचे नाव असून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उडकीस आली तसेच हॉटेल चावार्क च्या पाठीमागे सिमेंटरस्त्या लगत त्याचा मृतदेह आढळून आला तसेच घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी गेवराई उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत्यु कशाने झाला हे अद्याप निष्पन्नं झाले नाही. अधिक तपास गेवराई पोलिस करत आहेत.

Advertisement

Advertisement