Advertisement

कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

प्रजापत्र | Sunday, 10/01/2021
बातमी शेअर करा

आष्टी  :  बीड -आष्टी-अहमदनगर मार्गावर शुक्रवारी (दि.८)  पोखरी गावाजवळ मोटारसायकल-कार अपघातात पती जागीच ठार तर पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि.१०) पुन्हा सकाळी आष्टी शहराजवळील हंबर्डे  काॅलेजजवळ आतिश उबाळे (वय-२२) हे घराकडून आष्टी येथील पंपावर कामाला जात असताना अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी ९ च्या सुमारास घडली. 
                 चालकांचा वेगावर अंकुश नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. वाहन चालक यामार्गावर बेभान वाहने चालवताना दिसून येतात. तालुक्यातील पांढरी येथील युवक आतिश उबाळे (वय-२२) नाथ पेट्रोल पंपावर सकाळी घराकडून दुचाकीवर ( क्रं.एम.एच.२३ ए.६६११) जात असताना नगरहून बीडमार्गे जात असलेल्या चारचाकीने (क्रं.एम.एच.०९ बी.बी.००१२) जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी आतिश उबाळे याला उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. 

  हेही वाचा 

सव्वा महिन्यात दहा अपघात तर चार दगावले  
दरम्यान, यामार्गावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. चिंचपूर-आष्टी-कडा २७ किलोमीटर अंतरावर डिसेंबर ते आजपर्यंत १० मोठ्या अपघातात ४ जणांना जीव गमावावा लागला असून अनकेजण गंभीर जखमी होऊन अधू झालेले आहेत. यामुळे या रस्त्यावर गतिरोधक टाकून वेगाला मर्यादा घालाव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Advertisement

Advertisement