बीड : गेल्या दहा ते बारा दिवसापासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत तुमच्या मोबाईलवर एखादा मेसेज येतो तुम्ही महा विजेता ठरलात असं सांगितलं जातं, खालील लिंक ला टच करा असे सांगितले जात आणि लिंक ला टच करताच तुमच्या खात्यातील काही रक्कम ही आपोआप विड्रॉल होते असाच काहीसा प्रकार घडला आहे आहेर वडगाव येथे.
बीड तालुक्यातील आहेरवडगाव येथील खासगी कंपनीत काम करणारे सतीश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांना एका महिलेचा कॉल आला, तुम्हाला जॉब साठी एक लिंक पाठवत आहे त्या लिंकवर क्लिक करून एक फॉर्म भरा त्या फॉर्मची किंमत शंभर रुपये आहे सदर तरुणाने त्या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरताचं त्यांच्या क्रेडिट कार्डातून एकतीस हजार रुपये डेबिट झाले. या प्रकरणी सतीश शिंदे यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध तक्रार नोंदवली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक साबळे हे करत आहेत.
हेही वाचा