Advertisement

संभाजीनगर लोकसभेसाठी एकनाथ शिंदेंचा उमेदवार ठरला

प्रजापत्र | Friday, 19/04/2024
बातमी शेअर करा

 लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (१९ एप्रिल) पार पडले. एकीकडे मतदानाचा पहिला टप्पा संपलेला असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा वाद मिटलेला नाही. महायुतीतत  नाशिक, पालघर, ठाणे, दक्षिण मुंबई या जागांवर अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगराचाही  समावेश आहे. दरम्यान, या जागेसाठी महायुतीचा उमेदवार आता ठरला आहे. येथून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदिपान भुमरे यांना दिले २५ एप्रिल रोजी भुमरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

 

 

चंद्राकांत खैरे विरुद्ध संदिपन भुमरे असा होणार सामना
महाविकास आघाडीने याआधीच छत्रपती संभाजीनगरासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खैरे यांना तिकीट मिळाल्यानंतर महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार, असे विचारले जात होते. शिवसेना-भाजप यांच्या युतीत हा मतदारसंघ नेहमी शिवसेनेकडे राहिलेला आहे. यावेळी मात्र भाजपनेदेखील या जागेवर आपला दावा सांगितला होता. परिणामी या जागेवर महायुतीने उमेदवाराची घोषणा केली नव्हती. दरम्यान, आता संदिपान भुमरे यांच्या नावावर मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

Advertisement

Advertisement