Advertisement

नेकनूर जवळ तिहेरी अपघात !

प्रजापत्र | Thursday, 02/05/2024
बातमी शेअर करा

नेकनूर - नेकनूर परिसरातील येळंबघाट रस्त्यावर बोलेरो-ट्रॅक्टर- टेम्पो असा तिहेरी अपघात बुधवार (दि.१) रोजी रात्रीच्या सुमारास झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला.विनोद अशोक घोळवे असे या तरुणाचे नाव आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.नेकनूर येथे सुरू असलेला बेकायदेशीर लाकडाचा व्यवसाय या अपघातास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.

 

नेकनूर परिसरात लाकडाचा व्यवसाय करणाऱ्यांनी येळंबघाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बस्तान बसवले आहे. या रस्त्यावर बुधवारी (दि. १) रात्री साडेआठच्या दरम्यान लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची बोलेरो जीपला (MH 26.V. 3402) जोरदार धडक बसली. या अपघातात बोलेरो जीप रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. त्यानंतर याच ट्रॅक्टरला (MH16. f 7904) पाठीमागून आयशर टेम्पो (MH 24. AU.7885) धडक बसली. या अपघातात बोलेरो जीपमधील तालुक्यातील सारणी (सांगवी) येथील दसु उर्फ विनोद अशोक घोळवे (वय २५) याचा जागीच मृत्यु झाला असून काही जण जखमी आहेत. जखमींना नेकनूर रुग्णालयातील उपचारानंतर पुढील उपचारासाठी बीडला हलविण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement