Advertisement

 सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर!

प्रजापत्र | Thursday, 02/05/2024
बातमी शेअर करा

भारतीय संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रस्ते अपघातात त्याच्या मामाच्या मुलासह २ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक घटना हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यात घडली असल्याचं म्हटलं जात आहे. ही घटना घडल्यानंतर आरोपीने पळ काढला, मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना अटक केली आहे.  

 

घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी म्हटले की, ही घटना बुधवारी रात्री ११:३० च्या दरम्यान घडली. एका अज्ञात वाहनाने स्कुटीला धडक दिल्याने हा अपघात झाला. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असून, त्याच्यावर कारवाई देखील केली आहे. या आरोपीचं नाव शेर सिंग असल्याचं म्हटलं जात आहे. या धक्कादायक दुर्घटनेत स्कुटी चालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृत पावलेल्यांची नावं सौरव कुमार आणि शुभम असल्याचं म्हटलं जात आहे.

 

कांगडा जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी शालिनी अग्निहोत्री यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना म्हटले की, 'गग्गल पोलिस स्टेशनच्या हद्दीत हिट अँड रनचं प्रकरण समोर असल्याचं म्हटलं जात आहे. स्कुटीवर जात असलेल्या तरुणांना धडक दिल्यानंतर कार चालकाने तिथून पळ काढला. फरार आरोपीचा पाठलाग केल्यानंतर अखेर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Advertisement

Advertisement