Advertisement

हार्दिक पांड्या उपकर्णधार,शिवम दुबेला संधी राहुलला झटका !

प्रजापत्र | Tuesday, 30/04/2024
बातमी शेअर करा

 टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या १५ शिलेदारांची घोषणा करण्यात आली आहे.  रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे. हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ऋषभ पंत आणि संजू सॅमसन भारतीय संघाचे विकेटकीपर असतील. केएल राहुल याचा पत्ता कट झालाय. वेगवान गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, सिराज आणि अर्शदीप सिंह यांना स्थान मिळाले आहे. शिवम दुबे पहिल्यांदाच विश्वचषकात खेळणार आहे. शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद यांना राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. 

 

 

 

 

एक जूनपासून टी20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयनं आज टीम इंडियाच्या १५ शिलेदारांची घोषणा केली. रोहित शर्माकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. रोहित शर्माशिवाय यशस्वी जायस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना टॉप ऑर्डरचे फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना विकेटकीपर म्हणून निवडण्यात आले आहे

 

ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांनी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये टॉप 5 फलंदाजांमध्ये आहेत. त्याशिवाय दुबे यालाही संधी देण्यात आली आहे. गोलंदाजीत युजवेंद्र चहल आणि कुलदीप यांना संधी दिली आहे.

Advertisement

Advertisement