Advertisement

विवाहित महिलेचे अपहरण करून केला अत्याचार

प्रजापत्र | Tuesday, 27/02/2024
बातमी शेअर करा

 माजलगाव दि २७ (प्रतिनिधी) -ऊसतोड व्यवहाराच्या कारणावरून एका २८ वर्षीय विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दरम्यान सदरील महिलेला डांबून ठेवण्यात आल्याची घटना दि.२२ ते २४ फेब्रुवारीच्या दरम्यान घडली. सदरील प्रकरणी २६ फेब्रुवारी रोजी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एका मुख्य आरोपीसह इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 सविस्तर माहिती अशी की,पीडित महिला आपल्या पतीसोबत दि.२२ फेब्रुवारी रोजी रात्री माऊली फाट्यावरून मोटर सायकलने सावरगावकडे जात होती. यावेळी अशोक रामभाऊ जाधवर रा. काशीदवाडी ता. केज जि.बीड हे (स्कॉर्पियो एम.एच. २२ यु.७६५५) मधून आपल्या साथीदारांसह आले. आणि मोटर सायकलला स्कार्पिओ आडवी लावत म्हणाले, यांना गाडीत टाका. पती पत्नीस गाडीत टाकून नेऊन अशोक रामभाऊ जाधवर याने फिर्यादीस कळबच्या पुढे नेऊन आडरानात बळजबरीने अत्याचार केला. सोबत असणाऱ्या इतर पाच जणांनी फिर्यादीसह तिच्या पतीस पंचगंगा कारखाना इचलकरंजी कोल्हापूर येथे नेऊन बळजबरीने डांबून ठेवले व मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान पिडीत महिलेच्या फिर्यादी वरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी अशोक रामभाऊ जाधवर याच्यासह इतर पाच जणांविरुद्ध कलम ३७६ (१)३६५, ३४१,३४३.१४३. १४९. ५०४,५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement