Advertisement

माजलगावातून दुचाकी लंपास !

प्रजापत्र | Thursday, 22/02/2024
बातमी शेअर करा

माजलगाव दि.२२ (प्रतिनिधी)- शहरातील कोर्ट रोडवरून एका अज्ञात चोरटयांनी हिरो कंपनीची एचएफ डीलेक्स गाडी चोरून नेली असून याप्रकरणी माजलगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

माजलगाव शहरातील कोर्ट रोड येथून हिरो कंपनीची एचएफ डीलक्स (एमएच ४४ डब्लू ५०४२) हि गाडी सोमवार (दि.१९) रोजी रात्री ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी लंपास केली असून फिर्यादी ऋषिकेश घाटूळ (वय-२४) रा.रोशनपुरी याने अज्ञात चोरट्या विरुद्ध माजलगाव शहर पोलिसात तक्रार दिली असून या प्रकरणी चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement