Advertisement

ना.रामदास आठवले लिहिणार शिक्षण मंत्र्यांना पत्र.....! वाचा काय आहे मागणी....?

प्रजापत्र | Friday, 01/01/2021
बातमी शेअर करा

पुणे दि.१ - कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे.रामदास आठवले यांनी कोरेगाव आज भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

              कोरेगाव भीमा चा इतिहास पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाला, तर तो सर्व मुलांनाही कळेल, असं आठवले म्हणाले. तसेच आपण यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करू, असंही रामदास आठवले यांनी सांगितलं.

           दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2021 मध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित आदिवासी, ओबीसी आणि सवर्ण या सर्वांना न्याय देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करेल, असंही आठवले म्हणाले.

Advertisement

Advertisement