Advertisement

शिरूर तालुका काँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चाने सरकारला धडकी भरली

प्रजापत्र | Monday, 11/09/2023
बातमी शेअर करा

शिरूर- शिरूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा धडकला.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह जिल्हा सरचिटणीस भास्कर केदार यांच्या नेतृत्वाखाली दुपारी बारा वाजता विविध मागण्यांचे निवेदन प्रभारी तहसीलदार शिवनाथ खेडकर यांना देण्यात आले.

 

शासनाच्या वतीने विमा कंपनी मार्फत देण्यात येणारी अग्रीम रक्कम सर्वच मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावी.शंभर टक्के विमा लागू करावा.शासनाने हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे.रोहयोची कामे सुरु करावीत.दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या बळीराजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जावे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा पाण्याचे नियोजन करावे.संजय गांधी,श्रावणबाळ योजनेची मानधन रक्कम वाढविण्यात यावी.शेतमजुरांना त्यांच्या नावे जमिनी नसल्यामुळे भूमिहीन मजुरांचा सर्व्हे करुन अनुदान द्यावे यासह शेतकऱ्यांचे चालू वर्षातील पीक कर्ज माफ करुन तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

 

या मोर्चाला रामेश्वर शेळके,अशोक बहिरवाळ,ओबीसी जिल्हाध्यक्ष संभाजी जाधव,सेवादल जिल्हाध्यक्ष डॉ.दिलीपराव मोटे,ठकसेन तुपे,गणेश जवकर,परवेज कुरेशी,संतोष निकाळजे,आष्टीचे तालुकाध्यक्ष रविंद्र ढोबळे,हरिभाऊ सावंत,अशोक केदार,महादेव सावंत,असिफ शेख,अंबादास गोरे,अशोक केकान,ज्ञानेश्वर ढवळे,ज्ञानेश्वर थिटे,रवींद्र थिटे,विलास बेळगे,अर्शद शेख,नसीर शेख,रवी ढोबळे,सिराज पटेल यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

Advertisement

Advertisement