Advertisement

रुग्णवाहिका चालकांच्या थकीत वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

प्रजापत्र | Monday, 11/09/2023
बातमी शेअर करा

बीड - रुग्णवाहिका चालकांच्या थकीत वेतनासाठी आज (दि.११) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य १०२ वाहन चालक कर्मचारी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

 

आम्ही जिल्ह्यामध्ये शासकिय जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामिण रुग्णालयात, तसेच जि.प.बीड अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना २४ तास रात्री अपरात्री अल्प मानधनावर सेवा देण्याचे काम करतो. आमचे माहे २६ मार्च २०२३ पासून माहे जुलै २०२३ पर्यंतचे वेतन मिळावे म्हणुन आपल्या कार्यालयास तसेच सर्व जिल्हा विभाग प्रमुखाना दिनांक ३१/०७/२०२३ रोजी निवेदनही दिले होते. 

 

परंतु ऑगस्ट महिना उलटला तरी वेतन न मिळाल्याने आज (दि.११) रोजी महाराष्ट्र राज्य १०२ वाहन चालक कर्मचारी संघटनेच्या वतीने रुग्णवाहिका चालकांचे तात्काळ वेतन मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement