Advertisement

लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये स्वतःला खड्ड्यात पुरून घेत आंदोलन

प्रजापत्र | Friday, 08/09/2023
बातमी शेअर करा

बीड - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नाबाबत जालना येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण चालू असून राज्य सरकारच्या कसल्याही खेळीस बळी न पडता आरक्षण मिळवूच आणि आमच्या माता-भगिनींवर आणि बांधवांवर झालेल्या लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये आज (दि.८) रोजी सकाळी १० ते २ वाजण्याच्या वेळेत स्वतःला खड्ड्यात पुरून घेत एक दिवशीय आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नाबाबत जालना येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण चालू असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. याचे शासनाला कसलेही सोयरे सुचक नाही व शांततेत चालू असलेल्या त्यांच्या आंदोलनात राज्य सरकारच्या नेत्यांच्या आदेशावरून पोलीस बांधवांनी अतिशय क्रूरपणे लाठीचार्ज करुन आंदोलकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला परंतु, आम्ही जिव्हाळा महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्य सरकारला मा.जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हंटले आहे कि, आम्ही राज्य सरकारच्या कसल्याही खेळीस बळी न पडता आरक्षण मिळवूच आणि आमच्या माता-भगिनींवर आणि बांधवांवर झालेल्या लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ (दि.८) रोजी सकाळी १० ते २ वाजण्याच्या वेळेत स्वतःला खड्ड्यात पुरून घेत आंदोलन करण्यात आले. आमचे मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांचे जर काही बरे वाईट झाले तर आम्ही शांत बसणार नाहीत असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर मिराताई डावकर पाटील (अध्यक्ष जि.म.से.सं. तथा सामाजिक कार्यकर्त्या),सारिकाताई गायकवाड (समाज सेविका),सुरेखाताई जाधव (समाज सेविका) नैनाताई भाकरे (समाज सेविका),आशाताई ढोले (समाज सेविका) यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Advertisement

Advertisement