Advertisement

जिल्ह्यात ठीक ठिकाणी चक्काजाम

प्रजापत्र | Thursday, 07/09/2023
बातमी शेअर करा

बीड - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. याला पाठिंबा देण्यासाठी आज (दि.७) जिल्हाभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

दरम्यान, काही ठिकाणी १० वाजता सुरु करण्यात आले तर काही ठिकाणी पाऊस पडत असल्याने उशिरा करण्यात आले. यावेळी आंदोलकांकडून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा, यासाठी प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. 

 

 

आजच्या चक्काजाम आंदोलनातील काही छायाचित्रे : 

 

 

 

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकार विरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.  
 

 

 


धारूरमध्ये मुंडन करून सरकारचा निषेध करण्यात आला. व प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 
 

 

वडवणीत शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 

 

 

 

शिरूरमध्ये सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. 

 

 

 

आष्टीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 

 

 

 

राष्ट्रिय महामार्ग नेकनूर येथे बसस्थानका जवळ बंकटस्वामी चौक येथे सुरू असणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन सुरु असताना हजारोंच्या गर्दीतून मराठा बांधवांनी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली

Advertisement

Advertisement