गेवराई - तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग माजलगाव रोडवरील लोणावळा फाटा येथे अज्ञात वाहनाने महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असुन दुपारी उशिरापर्यंत मयत महिलेची ओळख पटली नव्हती. सोबतच्या छायाचित्रातील महिलेविषयी कोणाला काही माहिती असल्यास किंवा ओळखीची असल्यास तलवाडा पोलीस ठाणे ०२४४८- २५२०१३ आणि ८७८८७०५७०१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन तलवाडा ठाण्याचे सपोनि शंकर वाघमोडे यांनी केले आहे.
बातमी शेअर करा