परळी : येथील डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर गुरूवारी सकाळी ९ ते १० च्या दरम्यान वाहनांची तुफान गर्दी झाली होती. जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर, बस आणि गाड्या बऱ्याच वेळ एकाच जागी थांबून होत्या. राखेची वाहतूक याच उड्डाणपुलावरून केली जात असल्याने त्याचाही मोठा अडथळा निर्माण होत आहे.
गुरूवाती सकाळी परळीच्या उड्डाणपुलावर वाहनांची मोठी गर्दी दिसून आली. परळीतून बाहेर जाणारी आणि बीड रोड तसेच परभणी-गंगाखेडहून येणारी वाहने येथे बराच काळ अडकून पडली होती. शिस्तीत वाहने न चालवल्याने वाहने अडकून पडली होती. विशेष म्हणजे पोलिस चौकी ते छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके चौक) पर्यंत वाहने अडकली होती.
हेही वाचा
बातमी शेअर करा