दिल्ली:भारत सरकारने आणलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं आंदोलन आणखी आक्रमक होताना दिसतंय. विविध भागातून शेतकरी दिल्लीच्या दिशेनं निघाले आहेत. राजस्थान आणि हरियाणाच्या बॉर्डरवर शेतकरी जमा व्हायला लागले असून ते उद्यापर्यंत दिल्ली पोचतील.
केंद्र सरकारने दिलेला प्रस्ताव फेटाळल्यानंतर शेतकरी संघटनांनी आंदोलन आणखी आक्रमक करत, दिल्ली-जयपूर महामार्ग बंद करण्यासह सर्व टोलनाके टोल फ्री करण्याची घोषणा केलीय.शेतकऱ्यांनी काल रात्री उशीरा हरियाणामधील अंबाला आणि करनालचा टोल नाका बंद केला.जयपूर-दिल्ली हायवेवर शेतकऱ्यांचा दिल्ली मार्च आज नव्हे तर रविवारी (13 डिसेंबर) होईल, अशी माहिती स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचा दिल्ली मार्च शाहजहांपूर बॉर्डरपासून सुरू होईल, असंही यादव म्हणाले.
प्रजापत्र | Saturday, 12/12/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा