Advertisement

नियमीत वापरली जाणारी तब्बल ४८ औषधे गुणवत्ता चाचणीत फेल

प्रजापत्र | Thursday, 27/04/2023
बातमी शेअर करा

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (Central Drugs Standard Control Organisation) वेबसाईटवरुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. मधुमेह, रक्तदाब ते मल्टि व्हिटॅमिन्सची 48 औषधं गुणवत्ता मापदंड पार करण्यात अपयशी ठरली आहेत. 

हेल्थ रेग्युलेटर कडून भारतामध्ये अनेक सर्रास वापरल्या जाणार्‍या कॅल्शियम , फोलिक अ‍ॅसिड, मल्टिव्हिटॅमिन्स, अ‍ॅन्टिबायोटिक्स आणि अ‍ॅन्टि डायबेटिक तसेच हृद्यविकारांच्या गोळ्यांनी ड्र्ग्स क्वालिटी टेस्ट पास करू शकले नाहीत. दर महिन्याला याबाबत सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून वेबसाईटवर एक यादी जारी केली जाते. त्यामध्ये 48 औषधांचा समावेश करण्यात आला आहे.

मार्च महिन्यात 1497 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत त्यापैकी 48 मेडिसीन बॅचेसनी गुणवत्ता मापदंड पार केलेले नाहीत.

सरकराने जारी केलेल्या यादीत औषधे, वैद्यकीय उपकरणे किंवा सौंदर्यप्रसाधने समाविष्ट आहेत जी एकतर मानक दर्जाची नाहीत किंवा बनावट, भेसळयुक्त किंवा चुकीच्या ब्रँडेड आहेत. त्यामुळे फ्लॅग्ड प्रोडक्ट्सही मानक दर्जाची किंवा NSQ नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

एपिलेप्सी ड्रग, हायपरटेन्शन ड्रग, अँटी-डायबिटीज ड्रग कॉम्बिनेशन आणि एचआयव्ही ड्रग यासारखी सर्वाधिक विकली जाणारी औषधे ड्रग अलर्टचा भाग आहेत. यामध्ये लोकप्रिय हायपरटेन्शन औषध टेलमा देखील समाविष्ट आहे - ज्यामध्ये तेलमिसार्टन आणि अमलोडिपिन यांचा समावेश आहे.

इतर सामान्यतः वापरल्या जाणार्‍या औषधांमध्ये लोह आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या, प्रोबायोटिक्स आणि अनेक मल्टीविटामिन गोळ्या यांचा समावेश होतो. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 12, फॉलिक अ‍ॅसिड आणि नियासीनामाइड इंजेक्शन्सचाही समावेश आहे.

उद्योग तज्ज्ञांच्या मते, यादीत औषधाची नावं आल्यावर - बॅच नंबर, उत्पादनाची तारीख आणि कालबाह्यता तारीख - कंपनी संपूर्ण बॅच परत मागवते. “पुन्हा मागवल्यानंतर, संपूर्ण बॅच नष्ट करावी लागेल,” असे उद्योगातील अनुभवी व्यक्तीने सांगितले.

वारंवार गुणवत्ता तपासणीत अपयशी ठरणाऱ्या उत्पादन युनिट्स शोधण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी सरकारद्वारे अलर्टचा वापर केला जातो.

Advertisement

Advertisement