बीड-शहरापासून अवघ्या ८ ते १० किलोमीटर अंतरावर असलेल्या चऱ्हाट्या गावातील एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची चर्चा असून याला अद्याप वन विभाग अथवा डॉक्टरांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.मात्र त्या महिलेच्या म्हणण्यानुसार आज (दि.२) दुपारी १२ वाजता शेतात कापसाला पाणी देत असताना बिबट्याने आपल्यावर हल्ला चढविले असल्याचे तिचे मत आहे.वन परिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांचे पथक चऱ्हाट गावाकडे निघाल्याची माहिती त्यांनी प्रजापत्रशी बोलताना दिली.
इंदू विक्रम माने (वय-३२) असे त्या महिलेचे नाव असून त्या उकंड्याच्या पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या शेतात कापसाला पाणी देत असताना दुपारी १२ च्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.यावेळी त्यांच्या गळ्यात मफलर आणि अंगावर स्वेटर असल्याने त्या हल्ल्यात वाचल्या असून त्यांनी जोराने आरडाओरड करण्यास सुरुवात केली असता तिथून बिबट्याने पळ काढला असल्याचे त्यांचे मत आहे.या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली असून त्या भयभीत झाल्याचे गावातील ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान या बाबत वन विभागाकडून अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसून अमोल मुंडे यांचे पथक चऱ्हाट्याकडे रवाना झाले आहे.
बातमी शेअर करा