Advertisement

शेतकरी प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक

प्रजापत्र | Friday, 17/03/2023
बातमी शेअर करा

सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्यातील आज (17 मार्च) शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशीही विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आजही आंदोलन सुरु केलं आहे. 'खोके सरकारचा उपयोग काय शेतकऱ्यांना न्याय नाय' अशा घोषणा विरोधक देत आहेत.

 

अवकाळीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका
अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यासंदर्भात विधानसभेत अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनचा तिसरा आठवडा सुरु आहे. आजही विरोधक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी केली. दरम्यान, कालही विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी प्रतिकात्मक चूल बनवत गॅस दरवाढ, शेतकऱ्यांना मदत मिळावी तसेच बजेट म्हणजे फसवणूक अशा घोषणा देत निदर्शने केली होती. 

Advertisement

Advertisement