Advertisement

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी

प्रजापत्र | Tuesday, 14/03/2023
बातमी शेअर करा

राज्याच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. आज शिवसेनेकडून वकील हरीश साळवे युक्तिवाद करणार आहेत. तर राज्यपालांच्या वतीने सोलिसेटर जनरल तुषार मेहता हे बाजू मांडतील. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमके काय होते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सत्तासंघर्षाच्या या सुनावणीकडे लागले आहे. येत्या 48 तासांत सत्ता संघर्षांची सुनावणी संपणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचे राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. काहीच वेळात सुनावणीला सुरुवात होईल.

Advertisement

Advertisement