Advertisement

ठाकरे गटाची आजपासून 'शिवगर्जना'

प्रजापत्र | Saturday, 25/02/2023
बातमी शेअर करा

शिवसेना (ठाकरे गटाचे) आजपासून राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियान सुरु झाले आहे. आजपासून ते 3 मार्च दरम्यान हे अभियान सुरु राहणार आहे. शिवगर्जना अभियानामार्फत राज्यभरात पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागांचा दौरा करणार आहेत. दरम्यान, 27 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असल्यानं आमदारांचा या अभियानात समावेश नाही.

 

अभियानातून कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न 
केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेत्यांनी बैठका, चर्चा आणि राज्यातील विविध भागात दौरे करण्यावर भर देण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न या अभियानाद्वारे केला जाणार आहे. तसेच पक्षाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केले जाणार आहेत. या अभियानासाठी जिल्हावार पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा घेण्यात येणार आहे. तसेच शाखांची माहिती, पदाधिकाऱ्यांची रिक्त पदे, स्थानिक प्रश्नांची माहिती या अभियानाद्वारे घेतली जाणार आहे.

 

निष्ठावान नेत्यांवर अभियानाची जबाबदारी 
शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियानाची जबाबदारी निष्ठावान नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. विभागनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना नेते, उपनेते, माजी आमदार आणि युवासेना पदाधिकाऱ्यांवर शिवगर्जना अभियानाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार ओमराजे निंबळाकर, खासदार प्रियांका चतुर्वेदी, अनंत गीते, चंद्राकांत खैरे, नितीन बानगुडे पाटील या नेत्यांसह काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियानाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. 

 

कोणत्या विभागात कोणते नेते? 

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
सुभाष देसाई
मीना कांबळी
विशाखा राऊत
तुकाराम काते
तृष्णा विश्वासराव
राजोल पाटील

 

ठाणे, पालघर
खासदार राजन विचारे
योगेश घोलप
राजाभाऊ वाजे
राजुल पटेल
शितल देखरुखकर-शेठ

 

संभाजीनगर, जालना, बीड, परभणी
अनिल कदम, डॉ. जयप्रकाश मुंदडा, किशोर पेडणेकर, अंकित प्रभू

 

नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली

खासदार संजय जाधव
नितीन बानगुडे-पाटील
ज्योती ठाकरे
सुजित मिणचेकर
प्रविण पाटकर

 

नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा
खासदार अरविंद सावंत, लक्ष्मण वडले, अमोल किर्तीकर, शिवाजी चोथे, पवन जाधव

 

 

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार 
अनंत गीते
संजना घाडी
विजय औटी
पवन जाधव

 

 

चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम
चंद्रकांत खैरे
प्रकाश मारावार
हर्षल काकडे
शरद कोळी
दुर्गा शिंदे

 

 

बुलढाणा, अकोला, अमरावती
खासदार ओमराजे निंबाळकर
सुषमा अंधारे
शुभांगी पाटील
रामकृष्ण माडावी
अनिष गाढवे

 

अहमदनगर, सोलापूर, पुणे
विनोद घोसळकर
विजय कदम
सुभाष वानखेडे
उल्हास पाटील
साईनाथ दुर्गे
सुप्रदा फातर्पेकर

 

कोल्हापूर, सातारा, सांगली
खासदार संजय राऊत
खासदार प्रियंका चतुर्वेदी
लक्ष्मण हाके
बाबुराव माने
विक्रांत जाधव

Advertisement

Advertisement