गेवराई - शहरालगत असणार्या बागपिंपळगाव परिसरात रात्री 10 च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या संबधी अधिक माहिती अशी की गेवराई शहरालगत अवघ्या तीन किलोमिटर अंतरावर बागपिंपळगाव परिसरात बीड जालणा रोड खालुण वाहणार्या गावातील नदिच्या ठिकाणी दि 12 रोजी रात्री उमापुर येथुन गेवराईकडे येनार्या रुग्णवाहिका चालकाला हा बिट्या दिसला यावेळी बिट्या नदीत पाणी पिण्यासाठी आला होता यावेळी रुग्णवाहीका चालकानी त्याचा व्हिडीयो काढण्याचा प्रयत्न केला परंतु अंधार असल्यामुळे व्हिडीयो स्पष्ट नाही आला घटनेची माहिती पोलीसांना दिली यावरुन वनविभाग अधिकारी व प्रशासणानी बागपिंपळगाव येथील सरपंचाना संपर्क साधुन सावध राहण्याचे आवाहन केले आहे बिबट्या पुन्हा दिसल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहण प्रशासणाच्या वतीने करण्यात आले आहे तरी नागरीकांनी घाबरुण जावु नये असे आवाहण करण्यात आले आहे.