तलवाडा - गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन हद्दितील रूई येथील शेतकरी महारूद्र शहादेव लोखंडे यांच्या शेतात (रूई शिवारात) त्यांची दोन एकर शेती असून त्यांच्या शेतातील विहिरीवर मुख्यमंत्री सोलार योजना मधुन सोलार पंप मिळालेला आहे. महारुद्र लोखंडे हे (दि. 9) रोजी विहीरीवरील सोलार पंप चालू करण्यासाठी गेले असता तेथे स्टार्टर व कापलेला पाईप कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेला आहे असे त्यांना दिसून आले. सोलर पंप व स्टार्टरची अंदाजे किंमत 16560/- रूपय एवढी आहे. स्टाटर व सोलार पंप कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याने, अज्ञात चोरट्याविरूध्द तलवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलवाडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अमलदार पोना,सचीन कोरडे पुढील तपास करीत आहे
बातमी शेअर करा