गेवराई - गेवराई शहरालगत असणार्या बायपास जवळ एका खाजगी हॉटेलवर 25 किलो गांजा विक्रीसाठी येत आहे, अशी माहिती खब-या मार्फत गेवराई पोलिसांना मिळाली व तत्काळ वरिष्ठ अधिकारी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.हॉटेलमध्ये जाऊन झडती घेतली असता या ठिकाणी 25 किलो गांजा सापडला आहे.याप्रकरणी एकाला पोलिसांनी जेरबंद केले असुन त्यावर गून्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी,दि.25 जानेवारी मध्यरात्री 1 वाजण्या दरम्यान गेवराई पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे यांना गूप्तदारा मार्फत माहिती मिळाली की,गेवराई येथील बायपासवरील एका हॉटेलवर 25 कीलो गांजाविक्रीसाठी येत आहे.त्यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार यांना सगळी माहिती दिली,तसेच पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार प्रफूल्ल साबळे हे आपल्या काही सहकारी यांना घेऊन घटनास्थळी छापा मारला.यामध्ये 25 कीलो गांजा नावाचा आम्लपदार्थ मिळून आला. तसेच वरील एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.रात्री उशीरा या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांनी भेट दिली असून या प्रकरणी एका इसमा विरोधात गेवराई पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार यांच्या फिर्यादीवरूण एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार,साहय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे,नितीन राठोड,राजू भिसे,कृष्णाजायभाये, विठ्ठल राठोड,संजय राठोड यांनी केली आहे.पुढील तपास उपनिरीक्षक तूकाराम बोडकेहे करत आहेत.
बातमी शेअर करा