उमापूर - घोडेगाव जि.अहमदनगर येथे माहेरी गेलेली वडीलांसोबत उमापूरकडे येत असलेल्या दुचाकी व कंटेनर चा अपघात घोडेगाव जवळील चौफूलीवर (दि.१९) रोजी झाला . सदर दुर्घटनेत नजमा सद्दाम शेख(वय २२) या महिलेसह तीच्या सोबत असलेला दोन वर्षीय रेहान सद्दाम शेख यांचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
उमापूर ता.गेवराई येथील सद्दाम शेख यांची पत्नी नजमा ही बाळंतीन होण्यासाठी माहेरी घोडेगाव येथे गेली होती वडीलांसोबत मोटारसायकल वर जात असताना घोडेगाव-सोनई चौफूलि वर समोरून आलेल्या कंटेनर व मोटारसायकल मध्ये जोराची धडक होवुन मोटारसायकल वर बसलेली नजमा सद्दाम शेख व तीचा दोन वर्षीय मुलगा रेहान यांचा जागीच मृत्यू झाला तर मोटार सायकल चालवीत असलेले उस्मान पठाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.