Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - महिलांच्या प्रश्नावर बोलणार का ?

प्रजापत्र | Monday, 09/01/2023
बातमी शेअर करा

उर्फीचे कपडे किंवा आणखी कोणत्या महिलेचे वागणे, बोने, गौतमी पाटीलची कला यावर जे वाद या महाराष्ट्रात घातले जात आहेत, त्या वादातून महाराष्ट्रातील महिलांना काय मिळणार आहे? चित्र वाघ असतील किंवा रुपाली चाकणकर आताशा करुणा शर्मा  यांनी देखील या वादात रूढी घेतली आहे. मात्र आजही महिलांच्या पेहरावात संस्कृती शोधू पाहणारे किंवा भिव्य्क्ती शोधू पाहणारे देखील महिलांच्या मूलभूत प्रश्नांकडे पाहायला तयार आहेत का ?

 

राज्यात उर्फी जावेदच्या पेहरावावरून सध्या चित्रा  वाघ यांनी वादाला सुरुवात केली आहे. भाजपात गेल्यानंतर  चित्रा वाघ यांना एका नव्या संस्कृतीची ओळख झाली आणि आता त्या स्वतः त्या संस्कृतीच्या पाईक आणि वाहक बनल्या आहेत यात आश्चर्य ते कसले. ज्याचे खावे त्याचे गावे लागते हा तर समाजमान्य संकेत आहे, राजकारणात तर तो अधिक पाळावा लागतो. त्यामुळे चित्रा वाघ यांना उर्फी जावेदच्या तोकडे कपडे आक्षेपार्ह वाटणारच. त्यांना असेही राजकारण करायला काहीतरी लागतेच . त्यामुळे चित्रा वाघ यांनी महिलांनी कोणते कपडे घालावेत याला राजकीय मुद्दा केले आणि आता रौपली चाकणकरांपासून ते सुप्रिया सुळेंपर्यंत अनेकजण या वादात उतरत आहेत. हे कमी होते की काय , म्हणून आता गाडी करुणा शर्मा यांनी सुद्धा या वादात उडी मारली आहे.
मुळात उर्फीने कोणते कपडे घालावेत किंवा गौतमीने कशी कला सादर करावी, अगदी अमृता फडणवीस यांनी कोणते गाणे गावे किंवा कसे वागावे हे प्रश्न आजच्या महिलांचे प्रश्न होऊ शकतात का हाच यातला महत्वाचा विषय आहे. आपल्या राज्यघटनेने प्रत्येकाला आहार विहाराचे आणि अभिव्यक्तीचे देखील स्वातंत्र्य दिलेले आहे. हे खरे असले तरी त्यासोबतच त्या स्वातंत्र्यासोबतच काही सामाजिक संकेत प्रत्येकासाठी असतात. ज्यावेळी आपण समाजाकडून होणारे कौतुक स्वीकारतो , त्यावेळी काही सामाजिक संकेत पाळले जाणे अपेक्षित असते , मात्र हे करताना हे सामाजिक संकेत स्वयंघोषित संस्कृतीच्या ठेकेदारांनी लढायला नकोत हे देखील तितकेच महत्वाचे आहे. एखादी गोष्ट सामाजिक जनभावना असणे वेगळे आणि कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या चार दोन नेत्यांना वाटणे वेगळे. त्यामुळे हे सारेच वाद निरर्थक आहेत.
त्यापलीकडे जाऊन आजच्या महिलांचे प्रश्न वेगळे आहेत. ग्रामीण भागात ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्यांच्या कुटुंबातील महिलांचे जगणे काय आहे ? उमेद सारख्या कार्यक्रमातून हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या महिलांना स्वयंरोजगार मिळतो, इतर महिलांचे काय ? महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविमं चे सध्या काय सुरु आहे ? महिलांची सुरक्षा हा तर मोठाच प्रश्न आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना अजूनही वाढतच आहेत . नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रश्न वेगळेच आहेत. महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या कोणत्या योजना आज सरकारकडे आहेत ? जेंडर बजेटबद्दल नुसतीच चर्चा होते, मात्र त्याच्या अंमलबजावणीचे  काय ? असे कितितरी प्रश्न आहेत. विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचे प्रश्न, महिलांच्या शिक्षणातील गळतीचा प्रश्न , यावर मात्र कोणत्याच राजकीय पक्षाच्या महिला बोलत नाहीत, किंवा महिला आयोगासारख्या संस्था देखील यावर भाष्य करायला तयार नाहीत . या विषयांवर कोणी बोलणारच नसेल तर महिलांचे प्रश्न सुटतील कसे. आजच्या महिलांचे   प्रतिनिधित्व ना उर्फी जावेद ,गौतमी पाटील, अमृता फडणवीस करतात ना चित्रा वाघ, रुपाली चाकणकर यांना मैलांचे प्रश्न समजले आहेत .

Advertisement

Advertisement