Advertisement

धानोरा रोडची दयनीय अवस्था

प्रजापत्र | Saturday, 26/07/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२६(प्रतिनिधी): कालपासून सुरू (Beed)असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्‌ड्यांमध्ये पाणी साचले आहे. वेळोवेळी मागणी करुनही याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने पडत्या पावसात आज वंचित बहुजन आघाडीने धानोरा रोडच्या खड्ड्यात कागदाच्या होडी चालवून नगरपरिषद आणि लोकप्रतिनिधींचा निषेध केला.
       बीड शहरातील धानोरा रोड परिसरातील ३० मीटरचा मुख्य रस्ता गेल्या पंधरा वर्षापासून अत्यंत खराब स्थितीत असून, अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून,कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्‌ड्यांमध्ये पाणी साचले आहे. वेळोवेळी मागणी करुनही याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने पडत्या पावसात आज शनिवार (दि.२६) रोजी (VBA)वंचित बहुजन आघाडीने धानोरा रोडच्या खड्ड्यात कागदाच्या होडी चालवून नगरपरिषद आणि लोकप्रतिनिधींचा निषेध केला.नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.धुळीकाणामुळे व्यापारी वर्ग त्रस्त असून, विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.सदर रस्त्यासाठी वर्ष २०१९-२० मध्ये डांबरीकरणाचे काम मंजूर झाले होते आणि कंत्राटदारास कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते. मात्र, एका व्यक्तीने भूसंपादन मावेजाच्या मागणीसंदर्भात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाद मागितल्यामुळे हे काम रखडले. यावेळी जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, पुरुषोत्तम वीर,लखन जोगदंड,रोहन मगर,किरण वाघमारे, प्रकाश उजगरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement