Advertisement

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघात

प्रजापत्र | Sunday, 08/01/2023
बातमी शेअर करा

 मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास महालक्ष्मी मंदिरासमोरील पुलावर झालेल्या अपघातात तीन प्रवासी ठार झाले असून तीन प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्गाच्या गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर एका कारचा चालक ओव्हरटेक करताना कारवरील ताबा सुटून पुढे जात असलेल्या कंटेनर ट्रकला मागून जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच मृत्यूमुखी पडले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये एक वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश आहे. जखमींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खड्डा चुकवताना झाला अपघात

एक खड्डा चुकवताना या वाहन चालकांनी चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा पुढे आला आहे. वाहनातील मृत नालासोपारा येथील होते व ते भिलाड (गुजरात) येथे जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

अपघाता मधील जखमी आणि मृत व्यक्तींची नावे

जखमी 

१) दिपेश राठोड ३५ वर्ष

२) तेजल  राठोड  ३२ वर्ष

३) मधु राठोड ५८ वर्ष

मयत

 १) नवरोत्तम राठोड- ६५ वर्ष

२) केतन राठोड- ३२ वर्ष

३) आर्वी राठोड- १ वर्ष

Advertisement

Advertisement