देशातील 44 स्टार्टअप्सनी सुमारे 16,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यातील निम्मी संख्या 14 अॅडटेक कंपन्यांकडे होती. त्यांनी सुमारे 7 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. बायजूसारखे युनिकॉर्न या बाबतीत दुसऱ्यास्थानी आहे.लेऑफ ट्रॅकिंग वेबसाइट लेऑफनुसार, जगभरातील 930 कंपन्यांनी या वर्षात आतापर्यंत 1,46,407 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. 2021 मध्ये अधिक कर्मचाऱ्यांची भरती हे त्याचे मुख्य कारण होते. मात्र, यादरम्यान IT कंपनी एक्सेंचरने 1,57,000 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीही दिली. यामध्ये 60,000 हून अधिक कर्मचारी भारतातील आहेत.
नवीन वर्षात आयटी क्षेत्र 1.5 लाख नोकऱ्या देणार
मार्च 2023 च्या अखेरीस, TCS, Infosys, Wipro आणि HCL Tech सारख्या भारतीय IT कंपन्या 1.5 लाखांहून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहेत.
बातमी शेअर करा