दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चलपती राव यांचे निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. चलपती यांना त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांच्या प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककळा कोसळली आहे. तसेच कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, चलपती राव हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत होते. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. आज सकाळच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले.
बातमी शेअर करा