केरळ-तामिळनाडूच्या सीमेवर झालेल्या अपघातात आठ भाविकांचा मृत्यू झाला आहे. कुमिली येथे शबरीमलाच्या भाविकांचा कारचा अपघात झाला. शुक्रवारी रात्री झालेल्या या अपघातात दोनजण जखमी झाले असून यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
कुमिली-कंबम मार्गावर तामिळनाडूला पाणी वाहून नेणाऱ्या पहिल्या पेनस्टॉक पाईपजवळ ही घटना घडली. अपघातानंतर कार पाईपवर पलटी होऊन रस्त्यापासून सुमारे ४० फूट खोल खाली कोसळली.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचं नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात झाला. कारमध्ये एकूण १० प्रवासी होते. शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व प्रवासी तामिळनाडूचे रहिवासी होते. शबरीमला येथे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार.गाडी वेगात असल्याने हा अपघात झाला.
बातमी शेअर करा