अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. ९ डिसेंबर रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये ही झटापट झाली असल्याची माहिती आहे.याशिवाय झटापटीत दोन्ही देशांचे मिळून जवळपास ३० पेक्षा अधिक सैनिक जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. तवांग जवळ ही झटापट झाली आहे. याबाबत भारतीय लष्कराकडून अधिकृतरित्या माहिती अद्याप बाहेर आलेली नाही.
या झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये कमांडरस्तरीय चर्चा झाली होती. यानंतर दोन्ही देशाचे सैनिक मागे हटले होते. ऑक्टोबर २०२१मध्ये अरुणाचलमधील यांगसेमध्येही दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद उफाळला होता.तवांग जिल्ह्यातील यंगस्तेमध्ये ही झटपाट झाली. प्राप्त माहितीनुसार चीन पीपुल्स लिब्रेशन आर्मी LAC पर्यंत पोहचली होती. त्यांनतर भारती जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.