Advertisement

एसटीच्या विलीनीकरणासाठी आता भाजपचे नेते मैदानात

प्रजापत्र | Sunday, 11/12/2022
बातमी शेअर करा

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि माजी आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot ) सरकारविरोधात अमरण उपोषण करणार आहेत. येत्या 20 डिसेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Strike ) राहिलेल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी दोन्ही आमदार उपोषण करणार आहेत, अशी माहिती सेवा शक्ती संघर्ष एस. टी . कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सतिश मेटकरी यांनी दिलीय.  

 

 

गेल्या वर्षी 29 ऑक्टोबर 2021 पासून जवळपास सहा महिने एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती. यावेळी हे प्रकरण कोर्टात देखील गेलं. ठाकरे सरकारने त्यावेळी कर्मचाऱ्यांना पागरवाढ करण्यासाह अनेक मागण्या मान्य केल्या. परंतु, त्याची अंमबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा उपोषण करण्यात येणार आहे. परंतु, यावेळी हे उपोषण सकारमधील आमदराच करणार आहेत. आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांची सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटना एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरणासह इतर मागणीसाठी नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान 20 डिसेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत. त्यासाठी त्यांनी पत्र लिहून सरकारकडे परवानगी देखील मागितली आहे.  
 

Advertisement

Advertisement