मंदोस चक्रीवादळ शनिवारी पहाटे दोन वाजता चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकलं. चक्रीवादळानं समुद्र किनाऱ्यावर तांडव घातलं. चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये चार जणांचा मृत्यू झालाय. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूसह तीन राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, तसेच मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
चेन्नईमध्ये मंदोस चक्रीवादळामुळे 115 मिमी पाऊस झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. ते म्हणाले की, चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागांवर आमचं लक्ष आहे. नुकसानाचे मुल्यमापन केले जात आहे. मदतकार्य वेगानं सुरु असून मिळालेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झालाय. 89 जनावरांचा मृत्यू झालाय. तर यामुळे 151 घरांचं नुकसान झालेय