Advertisement

जुनी पेंन्शन व शंभर टक्के अनुदानासाठी सरकारशी बोलेन-हजारे

प्रजापत्र | Monday, 07/11/2022
बातमी शेअर करा

राळेगण सिध्दी दि.७ (प्रतिनिधी)-सर्वांनाच जुनी पेंन्शन योजना लागू करावी आणि निकषपात्र विनाअनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रा नुसार अनुदान देवून शिक्षकांची वेठबिगारी थांबवावी यासाठी सरकारशी बोलेन परंतु सरकारला आंदोलनाचीच भाषा कळते त्यामुळे या मागण्यांसाठी कर्मचारी शिक्षकांनी मोठे आंदोलन उभारण्याचा सल्ला जेष्ठ समाजसेवक पद्दमभूषण अण्णा हजारे यांनी दिला.

 

       मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम यांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन ट्रस्टचे विश्वस्त ॲड. अजित देशमुख,  मराठवाडा शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष डी.जी.तांदळे आणि जनआंदोलनाचे बीड जिल्हाध्यक्ष गोवर्धन मस्के यांचे समवेत रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी राळेगण सिध्दी येथे  भेट घेतली  त्यावेळी पद्दमभूषण अण्णा हजारे बोलत होते. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर त्यांचे सोबत चर्चा झाली. 01 नोव्हेंबर 2005 रोजी राज्य सरकारने स्विकारलेली अंशदायी पेंन्शन योजना अतिशय कुचकामी असल्याचे अण्णा हजारे यांच्या लक्षात आणून दिले. उमेदीचा काळ एखाद्या व्यवस्थापनात, सरकारी सेवेत व्यतीत केल्या नंतर उतार वयात त्यांनी त्या व्यक्तीची स्विकारलेली जबाबदारी म्हणजे पेंन्शन असल्याने बजेटचे कारण सांगून कर्मचारी शिक्षकांना वा-यावर सोडण्याची शासनकर्त्यांची भूमिका चुकीची असल्याचे अण्णा हजारे  म्हणाले.

 

        वीस बावीस वर्षां पासून राज्यातील हजारो शिक्षक  विनावेतन काम करत आहेत ही देखील दुर्दैवी बाब आहे. हा प्रश्न देखील राज्यकर्ते बजेटशी जोडतात आणि राष्ट्रनिर्मात्यांची प्रतारणा होते. मराठवाडा शिक्षक संघाने यासाठी घेतलेल्या आंदोलनाच्या भूमिकेचे कौतुक करत अण्णा म्हणाले की "या दोन्ही प्रश्नां बाबत मी सरकारशी बोलेन परंतु सरकारला आंदोलनाचीच भाषा कळते त्यामुळे या मागण्यांसाठी आणखी तीव्र आंदोलन उभे करा" असा सल्ला पद्दमभूषण अण्णा हजारे यांनी दिला.
 

Advertisement

Advertisement