Advertisement

पंजाबमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या घालून हत्या

प्रजापत्र | Friday, 04/11/2022
बातमी शेअर करा

अमृतसर - येथील शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत सुधीर सुरी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर सुरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता मृत घोषित केलं.

 

 

अमृतसर येथील गोपाळ मंदिराच्या बाहेर कचऱ्यात देवांच्या मुर्ती सापडल्या होत्या. यावरून मंदिराच्या बाहेर सुधीर सुरी आंदोलनाला बसले होते. तेव्हाच गर्दीतून आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत सुधीर सुरी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर आनन-फानन रुग्णालयात सुधीर सुरी यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती दिली आहे.

 

 

सुधीर सुरी यांना तीन ते चार गोळ्या लागल्याची शक्यता वर्तवली जात होती. मागील काही दिवसांपासून सुधीर सुरी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला जात होता. त्याची कुणकूण लागताच पोलिसांनी काही लोकांना अटक सुद्धा केली होती.

 

 

पंजाब एसटीएफ आणि अमृतसर पोलिसांनी २३ ऑक्टोबरला ४ जणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेले आरोपी रिंडा आणि लिंडा टोळीसाठी काम करत होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी सुधीर सुरी यांच्या हल्ल्याचा कट रचल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. यासाठी सुधीर सुरी यांची रेकीही केले होती. दिवाळीपूर्वीच सुरी यांच्यावर हल्ला करायचा होता, असेही आरोपींनी पोलीस चौकशीत सांगितलं होतं.
 

Advertisement

Advertisement