75 हजार पद भरतीमधील मोठा अडथळा दूर झाला आहे. राज्य सरकारनं आज शासन निर्णय जारी करत नियम शिथील केले आहेत. कोरोना महामारीमुळे नोकर भरतीला घातलेली 50 % ची मर्यादा शिथिल करत आता शंभर टक्के नोकरभरती करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकरने घेतलाय. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षात राज्यात 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णायामुळे शासनाच्या 29 विभागातील 75 हजार पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार सरकारनं ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा ठिकाणी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्याची मुभा दिली आहे.
ज्या विभागाचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही अशा विभागांमधील गट-अ व गट-ब गट ब मधील वाहनचालक व गट-ब संवर्गातील पदे वळून सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा दिली आहे. सरकारने मंजूर आकृतिबंध बाजूला ठेवून नोकर भरती करण्याची भूमिका घेतली आहे ही शिथिलता पुढची वर्षभर लागू असेल.
कोरोना महामारीमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने नोकरभरती वरती राज्य सरकारने बंधनं आणली होती. 50 टक्के मर्यादा ठेउन नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोविडसंपताच शिंदे सरकरने ही मर्यादा उठवली आहे. त्यामुळे आता शंभर टक्के नोकर भरती होणार आहे. राज्यात शासकीय कर्मचारी यांची दोन लाख 44 हजार 405 जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.