गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेतील बळींचा आकडा सोमवारी 134 वर पोहोचला. मृतांत 25 मुलांसह अनेक महिला व वृद्धांचा समावेश आहे. 170 जणांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी 6.30 वाजता 765 फूट लांब व अवघा 4.5 फूट रुंद झुलता पूल कोसळून ही दुर्घटना घडली होती. 143 वर्षे जुना हा पूल ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आला होता.
गेल्या 6 महिन्यांपासून हा पूल बंद होता. काही दिवसांपूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली. दुर्घटनेच्या 5 दिवस आधी 25 ऑक्टोबरला हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. रविवारी येथील गर्दी क्षमतेपेक्षा जास्त होती. हेदेखील अपघाताचे कारण असल्याचे बोलले जात आहे.
बातमी शेअर करा