Advertisement

आता सरकारकडे करा 'फेसबुक, ट्विटर'ची तक्रार

प्रजापत्र | Saturday, 29/10/2022
बातमी शेअर करा

 सोशल मीडिया  युजर्सना आता थेट सरकारकडे ट्विटर  आणि फेसबुक  संबंधित तक्रार करता येणार आहे. सरकारकडून तक्रार कक्ष स्थापन करण्यात येत आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये सरकार तक्रार समिती स्थापन करेल, जिथे युजर्सना ट्विटर आणि फेसबुक संबंधित तक्रार दाखल करता येईल. कोविड महामारी दरम्यान ट्विटरने सरकारच्या तक्रारीकडे लक्ष देण्यास नकार दिला होता. भारताचे नियम ट्विटरवर लागू होत नसल्याचं कारण ट्विटरने भारत सरकारला दिलं होतं. त्यानंतर सरकारने तक्रार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यापुढे तुम्हाला फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबाबत काही तक्रार करायची असेल तर सरकारच्या तक्रार कक्षाची मदत होणार आहे.

 

 

सरकारची ही तक्रार समिती सोशल मीडिया कंपन्यांमुळे युजर्सना होणाऱ्या समस्या आणि तक्रारी ऐकून घेऊन त्यांचं निवारण करेल, ज्या समस्या किंवा तक्रारी सोडवण्यात कंपनी अकार्यक्षम आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेमध्ये सरकारने सांगितलं आहे, की वापरकर्त्यांच्या (Users) तक्रारीसाठी पुढील तीन महिन्यांमध्ये सरकाकडून तक्रार समिती स्थापन करण्यात येईल. फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या टेक कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचं हे मोठं पाऊल आहे.

Advertisement

Advertisement