Advertisement

ड्रायव्हर-कंडक्टर जिवंत जळाले

प्रजापत्र | Tuesday, 25/10/2022
बातमी शेअर करा

झारखंडची राजधानी रांचीमध्ये बसला आग लागून दोन जण जिवंत जळाले. चालक-कंडक्टर दिवाळीची पूजा करून बसमध्ये दिवे लावून झोपले होते. बसमधील दिव्यांमुळेच आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. हळूहळू आगीने संपूर्ण बसला वेढले. सोमवारी रात्री एक वाजता ही दुर्घटना घडली.

 

 

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, रांचीच्या खडगर्हा बसस्थानकावर बसला लागलेल्या आगीत ड्रायव्हर आणि कंडक्टरचा मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे. देव दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.ही घटना रांचीच्या खडगर्हा बस स्टँडची आहे. बसमध्ये चालक आणि वाहक झोपले होते. यादरम्यान पूजेच्या दिव्यामुळे बसने पेट घेतला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. ड्रायव्हर-कंडक्टरचा जळालेला मृतदेहही सापडला आहे. ही बस रांची ते सिमडेगा मार्गावर धावत होती.खडगर्हा बसस्थानकावर मूनलाईट बसमध्ये पूजा केल्यानंतर ड्रायव्हर मदन आणि कंडक्टर इब्राहिम दिवा लावून झोपले होते. यादरम्यान बसमध्ये आग लागली. बसस्थानकाजवळ इतरही बसेस उभ्या होत्या. बसला आग लागल्यावर सर्वांच्या नजरा त्याकडे गेल्या. लोकांनी लगेच अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाने बसमधील आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला होता.

Advertisement

Advertisement