Advertisement

युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्या

प्रजापत्र | Thursday, 20/10/2022
बातमी शेअर करा

राज्यभरात कालपर्यंत (19 ऑक्टोबर) झालेल्या पावसाचे (Rain) पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करुन मदत द्या असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाला दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet) आज (20 ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आलं आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्यास सांगितलं आहे.

 

 

 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामात विशेष लक्ष घालावं. पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना  सराकारतर्फे प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Advertisement

Advertisement