नवी दिल्ली : शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा फैसला लांबणीवर गेलाय. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज धनुष्यबाणाचा निर्णय होणार नाही, अशी माहिती समोर आलीय. आज धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आजच घेतला जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती . दरम्यान, आता समोर आलेल्या माहितीनुसार हा फैसला आज होणार नसल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय लांबणीवर पडला आहे.शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हाबाबत पुरावे सादर करण्यासाठी दिलेली मुदतही आज संपली आहे. शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लवकर घेतला जावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय लवकर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र हा फैसला पुन्हा लांबणीवर पडलाय.शिवसेनेचे नेते दुपारी एक वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार आहे. त्यासाठी अनिल देसाई नवी दिल्लीत दाखल झाले. धनुष्यबाण हे चिन्हा शिवसेनेकडेच राहिल, असा विश्वास शिवसेनेच्या वतीने व्यक्त केला जातोय.
बातमी शेअर करा