Advertisement

कारने 12 जणांना चिरडले, 6 ठार

प्रजापत्र | Friday, 02/09/2022
बातमी शेअर करा

गुजरातमधील अरावलीतील कृष्णपूरजवळ शुक्रवारी पहाटे एका भरधाव कारने 12 पादचाऱ्यांना चिरडले. यात सहा पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. यातील बहुतांश प्रवासी पंचमहाल जिल्ह्यातील कलोल येथील रहिवासी होते. सर्वजण अंबाजी दर्शनासाठी पायी जात होते. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आले.

 

 

गाडीची स्थिती पाहूनच अपघाताचे गांभीर्य कळू शकते. कारच्या पुढील भागाचे पूर्ण नुकसान झाले आहे. गुजरातचे अंबाजी मंदिर हे शक्ती, भक्ती आणि श्रद्धा यांचा संगम असल्याचे म्हटले जाते. या देवीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येतात.

 

 

मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत
या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, अरावली जिल्ह्यातील मालपूरजवळ अंबाजी दर्शनासाठी जाणाऱ्या पादचाऱ्यांची ही घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या यात्रेकरूंच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना रु. 4 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 

Advertisement

Advertisement