Advertisement

रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या चालकाचा अपघाती मृत्यु

प्रजापत्र | Wednesday, 13/07/2022
बातमी शेअर करा

परळी दि.13 जुलै – रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या चालकाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना परळी तालुक्यातील दगडवाडी जवळ घडली. अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात रुग्ण सोडून गंगाखेडकडे परत जात असलेली रुग्णवाहिका पलटी होऊन झालेल्या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक जागीच ठार झाला.

 

 

अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात रुग्णाला सोडून एक रुग्णवाहिका (Ambulance) परत गंगाखेडकडे चालली होती. दरम्यान परळी – गंगाखेड रस्त्यावर दगडवाडी जवळ एका चढावर रुग्णवाहिकेवरील चालकाचा ताबा सुटला. रुग्णवाहिका रस्त्याच्या खाली उतरून पलटी होवून अपघात झाला. या अपघातात (Accident) रुग्णवाहिकेचा चालक जागीच ठार झाला आहे.

 

 

रुग्णवाहिका चालकाचे नाव गजानन चिलरगे असून रुग्णवाहिकेखाली दबल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली.‌ चालकाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी परळी येथील शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला आहे. दरम्यान, रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिका चालकाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Accidental death of a driver who saved the life of a patient; Ambulance accident.

Advertisement

Advertisement