परळी - तालुक्यातील तडोळी येथे पुण्यतिथीच्या कार्यक्रमातील जेवणातून जवळपास २४ ग्रामस्थांना विषबाधा झाली. ही घटना गुरुवारी (दि.०७) सायंकाळी घडली. सर्व बाधितांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तडोळी येथे गुरुवारी गोविंद किसन सातभाई यांच्या आईच्या पुण्यतिथी निमित्त जेवणाची पंगत आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने बहुतांशी ग्रामस्थांनी पंगतीत जेवण केले. त्यापैकी काही जणांना सायंकाळी उलटी आणि मळमळचा त्रास सुरू झाला. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वांना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बातमी शेअर करा