Advertisement

शेतातील उभा ऊस पेटवून शेतकऱ्याने केली आत्महत्या

प्रजापत्र | Wednesday, 11/05/2022
बातमी शेअर करा

गेवराई-जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून ऊस शेतातच उभा असल्यामुळे आज (दि.११) दुपारी १ च्या सुमारास शेतकऱ्याने ऊस पेटवून दित शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

 नामदेव आसाराम जाधव (वय-35 रा.हिंगणगाव ता.गेवराई) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.बीड जिल्ह्यातील  हजारो हेक्टरवरील ऊस अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतात ऊभा आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट असून आपल्या शेतातील ऊस कारखाना नेईल की नाही ? हि शाश्वती नसल्याने शेतकरी नैराश्येत आहे. यामधूनच गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव जाधव यांनी कारखान्याकडे वेळोवेळी ऊस घेऊन जाण्याबद्दल विनंती केली. मात्र अद्यापही ऊस तोडून न नेल्याने त्यांनी आज बुधवारी दुपारी शेतातील उभ्या ऊसाला नैराश्यातून आग लावली. यानंतर शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Advertisement

Advertisement