परळी वै-दि.२७ (वार्ताहर)-वाशिमहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीतील वारकऱ्यांच्या सोबत असणाऱ्या एका अॅटोला परळी जवळील दादाहरी वडगाव जवळ रविवारी (दि.२७) दुपारी अपघात झाला. या अपघातात एक वृद्ध वारकरी महिला मृत्युमुखी पडली असून अन्य चार जण जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. या अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला भाजपा नेते राजेश गित्ते तात्काळ धावून आले व त्यांनी जखमींच्या उपचारासाठी मदत केली.
वाशिम येथील मुगसाजी महाराज यांचा पायी दिंडी सोहळा वाशिमहून परळी वैजनाथ मार्गे पंढरपूर कडे निघाली होती.यावेळी परळीजवळ वारकऱ्यांच्या दिंडीतील अॅटोवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अॅटो रस्त्याचा कडेला जाऊन पलटी झाला.यामध्ये सुमित्राबाई खाडे (वय-७०) यांचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य चार वारकरी जखमी झाले असून त्यांनी प्राथमिक उपचार करून अंबाजोगाईला हलविण्यात आले. जखमींमध्ये समाधान लोखंडे (वय-४९ रा.वाशिम,) गोकर्णाबाई खंडागळे,हेमलता हतवलकर, नलीनी हांडगे यांचा समावेश आहे.